डिजीटल शहर म्हणून पुणे शहराची जगाच्या नकाशावर ओळख व्हावी – मुक्ता टिळक

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या वतीने पीएमसी केअर २.०, एंटरप्राईज जीआयएस, या प्रकल्पांचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झालेल्या या समारंभात ई-लर्निंग प्रकल्पाचा शुभारंभ आणि सिटी डिजीटल स्ट्रॅटेजीचे अनावरणही झाले.

यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन सेवा सुविधांसंदर्भात मागील वर्षापासून अत्यंत प्रभावी कामकाज केले आहे. आज शुभारंभ होत असलेल्या एंटरप्राईज जीआयएस, ई-लर्निंग प्रकल्प, सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी, पीएमसी केअर २.० यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा देत असतानाच प्रशासनात नागरिकांचा सहभाग वाढणार आहे. मिळकत कर, जन्म-मृत्यू दाखले, मनपाच्या विकासकामांची माहिती आदी सुविधा ऑनलाईन माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहेत. या प्रकल्पांमुळे रस्ते दुरुस्ती, नळ कनेक्शन जोडणी, सेवा वाहिन्या याबाबत वेळेत माहिती प्राप्त झाल्याने प्रशासन व नागरिकांना लाभ होणार आहे. नागरी सहभागामुळे खर्‍या अर्थाने पुणे शहर डिजीटल शहर होवून जगाच्या नकाशावर ठसा उमटवेल. डिजीटल क्षेत्रात अशा प्रकारचे कार्य करणारी पुणे महानगरपालिका एकमेव ठरलेली आहे, असेही त्यांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)