डिजीटल प्रसारण धोरण लवकरच जाहीर करणार – स्मृती इराणी

नवी दिल्ली – केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यातर्फे डिजीटल प्रसारण आणि डिजीटल बातम्यांच्या संबंधात लवकरच एक नवीन धोरण जाहीर केले जाणार आहे अशी माहिती या खात्याच्यामंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. आज येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की डिजीटल प्रसारणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाव मिळाला पाहिजे ही मागणी रास्त आहे पण त्यात वेळी या प्रसारणाचा वापर करून जातीद्वेष आणि तणाव निर्माण करण्याचा प्रकारही होता कामा नये याचीही दक्षता घेतली पाहिजे त्यामुळे यात समतोल साधण्याचा प्रयत्न या नवीन धोरणात केला जाईल असे त्यांनी नमूद केले.

त्या म्हणाल्या की, भारतीय पीनल कोड मध्ये राजकारणासाठी जाती, धर्माचा वापर केल्यास त्याला शिक्षा देण्याची तरतूद आहे. पण केम्ब्रीज अनॅलॅटिका सारखी प्रकरणे बघितली तर मतदारांचे जात निहाय विश्‍लेषण करून त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठीची रणनिती काही राजकीय पक्षांतर्फे आखली जात आहे त्याला प्रतिबंध घालण्याचा कोणताही उपाय नाही ही स्थिती टाळण्याची गरज असून त्यासाठीही काहीं तरतूदी आता कराव्या लागतील.डिजीटल डाटा चोरून त्याचा निवडणुकीच्या राजकारणात वापर केल्याचा आरोप असलेल्या केम्ब्रीज ऍनालॅटिका कंपनीशी कॉंग्रेसचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. नमो ऍप या पंतप्रधान मोदींच्या ऍप मधून डाटा त्रयस्थ देशाला दिला जात असल्याच्या आरोपाचेही त्यांनी यावेळी खंडन केले.

आपला पक्ष जातनिहाय उमेदवार निवडीवर विश्‍वास ठेवत नाहीं असे नमूद करताना त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की माझी मंत्री म्हणून झालेली निवड माझ्या नावावरून झालेली नाहीं तर काम बघून आपल्याला ही संधी देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)