डिजीटल इंडियाची ऐशीतैशी

नागरिकांनो, पुन्हा एटीएमबाहेर रांगा लावण्यासाठी तयार रहा

सातारा – देशातील 50 टक्के एटीएम मशीन्स पुढील चार महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च 2019 पर्यंत बंद पडणार आहेत. असे झाल्यास देशातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम होणार असून नागरिकांना पुन्हा एकदा एटीएमबाहेर रांगा लावण्यासाठी तयार रहावे लागणार आहे.डिजीटल इंडियाचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे.नोटाबंदीला याच महिन्यात 2 वर्षे पुर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता नागरिकांना पैसे टंचाईचा तोच अनुभव पुन्हा येणार आहे.

सरकारने मोठा गाजावाजा करुन लोकांना ऑनलाईन होण्यासाठी आणि कमीतकमी रोख व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले असले तरी यंत्रणा तेवढी सक्षम नाही हे अनेकवेळा समोर आले आहे.देशातील एटीएम बंद होण्याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे एटीएममधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसणार आहे.मुळात ग्रामीण भागात एटीएम मशीन्सची संख्या कमी आहे.तेथील एटीएम मशीन्स बंद झाली तर लोकांनी व्यवहार कसे करायचे हाच खरा प्रश्‍न आहे.सध्या जी एटीएम मशीन्स चालू आहेत ती अनेकवेळा बंद असतात किंवा त्यामध्ये पैसे नसतात.दुसऱ्या बॅंकेच्या एटीएम मशीन्समधून पैसे काढले तर आर्थिक फटका बसतो.

-Ads-

दोन वर्षापुर्वी नोटाबंदीनंतर बॅंकेबाहेर रांगेत उभे असताना देशाच्या विविध भागांमध्ये 70 पेक्षा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त त्यावेळी समोर आले होते.नोटाबंदीनंतर नवीन नोटांच्या छपाईवरील खर्च वाढल्याचे रिझर्व्ह बॅंकेचा अहवालही सांगतो. आणि आता या छापलेल्या नवीन नोटा जुन्या एटीएम मशीन्सला सूट होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.2000 आणि 500 च्या नवनि नोटा सोडल्या तर 200,100च्या नवीन नोटा एटीएम मशीन्समध्ये अद्यापही कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

लोकांनी कमीतकमी प्रमाणात रोख पैसा वापरावा आणि कार्डवव्यवहार जास्त करावेत अशी सरकारची अपेक्षा असली तरी देशातील बहुसंख्य जनतेल अद्यापही डिजीटल व्यवहार करताना सुरक्षित वाटत नाही.पेन्शनधारक अजुनही पेन्शनसाठी बॅंकेच्या शाखेत जाउन कॅंशियरसमोर रांगा लावत असतात.सात बारा उतारे ऑनलाईन होण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ झाली नाही.

निवडणुकांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली असली तरी त्यातही अडचणी येत असल्याचे नगर महापालिका निवडणुकीवरुन समोर आले आहे.कोणत्याही सरकारी वेबसाईटला वेग आणि अचूकता याचे वावडे असते की काय याची शंका येते.सर्व खाजगी संस्थांमधील डिजीटल व्यवहार वेगाने आणि अचूक होत असताना सरकारी वेबसाईटवर साधा परीक्षेचा फॉर्म भरणेही जिकीरीचे बनून जाते.एकूणच डिजीटल इंडियाची अशी परिस्थिती असताना आता एटीएम मशीन्स कमी होण्याने हे संकट अधिकच गडद होणार आहे.

डिजीटल फटका
सरकारकडून कायम डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे.कामे वेगाने व्हावीत हा डिजीटल व्यवहारांचा उद्देश असतो.पण सरकारने आतापर्यत जेथे जेथे डिजीटल ऑनलाईन यंत्रणा आणली तेथे तेथे कामांना विलंब लागला आहे.शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया याचे उत्तम उदाहरण आहे.शैक्षणिक वेबसाईटस आणि परीक्षेच्या सरकारी वेबसाईटवर होणाऱ्या विलंबामुळेही अनेकांना फटका बसला आहे.म्हणूनच सरकारला आता या एकूणच यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि वेगवान होण्यासाठी जणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)