डिजिटल युगामध्ये साहित्याचा विसर पडू नये- अण्णा हजारे

 राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास प्रतिसाद

सुपा: विद्यार्थ्यांनी अधुनिक युगात कला व साहित्याचा विसर पडू देऊ नये. त्यीां कला व साहित्य आपल्यात कसे अवगत होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अण्णा हजारे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकार दिनानिमित्त पारनेर तालुका पत्रकार संघ व म्हसणे फाटा येथील श्री समर्थ पॉलिटेक्‍निक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चौथ्या युवा साहित्य संमेलनाचा प्रारंभ हजारे यांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री समर्थ पॉलिटेक्‍निकचे कैलास गाडीलकर, सुरेश पठारे, गणेश बोठे, पारनेर पंचायत समितीचे नगरसेवक नंदकुमार देशमुख, चंद्रकात चेडे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. ती जागी झाली तरच राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल आहे. विद्यार्थ्यांनी शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडा त्याग व अपमान पचवण्याची ताकद, या गोष्टी अंग बानवल्या, तर ते यशस्वी होतील. समर्थ पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, मावळे यांच्या पारंपरिक वेशात ‘मी मराठी’ हे लोकगीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी हजारे यांच्या हस्ते पत्रकार विजय वाघमारे यांचा निर्भिड पत्रकारिता पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, साहित्यिकांना नेहमीच ऊर्जा देण्याचे काम अण्णा हजारे यांनी केले. ते जाणिवांचे आकाश आहेत. मी पारनेरमध्ये आल्यानंतर माझे दोन श्रद्धास्थान आहेत. एक म्हणजे संत निळोबाराय आणि दुसरे म्हणजे अण्णा हजारे. ग्रामीण भागात संस्कार टिकून आहेत. मात्र शहरी भागातील संस्कार व संवाद नेटच्या जमान्यात हरपत चालला आहे. तो संवाद साधण्याचे काम पारनेर पत्रकार संघ करत आहे.

यावेळी श्री समर्थ पॉलिटेक्‍निकचे कैलास गाडीलकर, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, देविदास आबुज, पत्रकार विनोद गोळे, उदय शेरकर, सुभाष दिवटे, शिवाजी पानमंद, दत्ता शेरकर, विजय वाघमारे, शरद झावरे, शरद रसाळ, भास्कर पोपळघट, श्रीकांत ठुबे, संतोष विधाटे, सतीश रासकर, कानिफनाथ गायकवाड, सनी सोनावळे, सतीश ठुबे, भगवान गायकवाड, भाऊसाहेब खेडेकर, किरण शिंदे, सुनील पठारे, दत्ता उनवणे, भास्कर कवाद, राम तांबे यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे सदस्य श्री समर्थ पॉलिटेक्‍निकचे सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)