डिजिटल फसवणूक टाळायची तर… (भाग-१)

डिजिटल माध्यमांचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसा सायबर गुन्हेगारीचा आलेखही उंचावत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, 2000 मध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्‍यकता आहे. हे करत असताना नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वरील कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या न्यायिक संस्था कार्यरत असणे अत्यावश्‍यक आहे.

आर्थिक सायबर गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा संबंधित व्यक्‍तीच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो. सायबर गुन्ह्यांमुळे अनेक कुटुंबे आणि जोडप्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होताना मी पाहिले आहे. सायबर गुन्ह्यांमुळे अनेक तरुणांची करिअरही उद्‌ध्वस्त झालेली आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे मानसिक आजार होण्याची संख्याही वाढलेली दिसून येते. सामान्यत: एखादा गुन्हा झाला, तर त्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्‍तीला सहानुभूती मिळते; परंतु सायबर गुन्हा झाला, तर तुम्ही भोळेभाबडे आहात असे गृहीत धरले जाऊ शकत नाही. कारण सायबर गुन्हा हाताळताना माझ्या असे लक्षात आले आहे की, कुठे तरी तुमच्या हलगर्जीपणामुळे किंवा ठरवून केलेल्या दुर्लक्षितपणामुळे सायबर गुन्हा आपल्यावर ओढवून घेतलेला असतो. उदाहरणार्थ, पासवर्ड न बदलणे, पासवर्ड इतरांशी शेअर करणे, तोच तोच पासवर्ड वापरणे, पासवर्ड कुठे तरी लिहून ठेवणे, अशा गोष्टींमुळे एकाअर्थी सायबर गुन्हे आपल्यासोबत घडण्यासाठी आपण स्वतःच गुन्हेगाराला आमंत्रण देतो. कार्यालयातही आपण आपल्या सेक्रेटरीकडे आपल्या सोशल मीडियाचा पासवर्ड, युजरनेम, एकूण आपल्या व्हर्च्युअल अस्तित्वाच्या किल्ल्याच हाताळायला देतो. आपल्या कुटुंबात एखादा मोबाइल एकापेक्षा जास्त लोकांनी वापरणेही चुकीचे आहे. ऑनलाइन बॅंकिंग करत असाल, तर भलत्या सलत्या ई-मेलमधील लिंकवर क्‍लिक करून आपल्या बॅंक खात्याची माहिती अनाहूतपणे सायबर गुन्हेगारांना पुरवली जाणे ही आपलीच चूक असते. सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला वाचवायचे असेल तर त्याबाबत तशी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

नेहमीच सायबर गुन्हा एका व्यक्‍तीच्या चुकीमुळे होतो असे नाही. बऱ्याचदा तो सिस्टीमच्या चुकीमुळेही होतो. बरीच मंडळी आजकाल फेसबुकवर असतात. फेसबुकवर आपण आपली संपूर्ण माहिती देत असतो. परिवारात होणारे समारंभ, त्याची माहिती, फोटो, आपला प्रवास, लोकेशन, तसेच आपण कुठली गाणी ऐकतो, कुठला चित्रपट पाहायला जातो अशी माहिती यावर शेअर केली जाते. काही लोक तर अगदी आपली वजन, उंची आवडनिवड अशा प्रत्येक गोष्टी त्यावर लिहितात. सोशल मीडियावरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिजिटल फसवणूक टाळायची तर… (भाग-२)

आपले, आपल्या कुटुंबातील व्यक्‍तींचे खासगी फोटो, तसेच लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे. आपण जात असलेल्या अथवा भेट दिलेल्या जागांची तंतोतंत माहिती, फोटो प्रसिद्ध करू नयेत. समजा, एखादेवेळी तुम्ही तुमच्या प्रवासाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि तुमच्या एखाद्या मित्राच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या एखाद्या व्यक्‍तीने त्या माहितीचा दुरुपयोग करून तुमच्या घरात चोरी अथवा घरातील महिलेशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला तर? आणि ही केवळ शक्‍यता नाही तर अशा गोष्टी प्रत्यक्ष घडलेल्या आहेत.

– अॅड. प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)