डिजिटल फसवणूक टाळायची तर… (भाग-२)

डिजिटल माध्यमांचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसा सायबर गुन्हेगारीचा आलेखही उंचावत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा, 2000 मध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्‍यकता आहे. हे करत असताना नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वरील कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या न्यायिक संस्था कार्यरत असणे अत्यावश्‍यक आहे.

डिजिटल फसवणूक टाळायची तर… (भाग-१)

फेसबुकवर आपण कुणाबरोबर मैत्री करावी, कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारावी याचे स्वतःलाच एक बंधन घालून घ्यावे. तुम्हाला एखाद्या परदेशातील व्यक्‍तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तर त्या व्यक्‍तीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांची फ्रेंडलिस्ट तपासून त्यात किती व कोण इतर लोक आहेत हे पाहावे. फक्‍त तुम्हीच एकटेच त्यात असाल तर समजून जावे, की हा एक सापळा आहे. कधी असेही होते, की परदेशी व्यक्‍तीच्या फ्रेंड लिस्टमध्ये सर्व भारतीय असतात, तेव्हा धोक्‍याचा इशारा समजून अशा बोगस परदेशी व्यक्‍तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. कारण अशा व्यक्‍ती तुमच्यामार्फत दुसऱ्या लोकांनाही लुबाडू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलीकडे वधू-वर संशोधन मॅट्रिमोनियल वेबसाइटवर करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण तुम्ही कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये नाव रजिस्टर केले असेल आणि तुमचा मोबाइल नंबर तुमच्या प्रोफाइलमध्ये असल्यास, वधू किंवा वराची फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला व्हॉट्‌सअॅपवर अथवा फेसबुकवर आली तर प्रत्यक्षात भेटल्याशिवाय त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. वधू-वरसूचक वेबसाइटवरून तुम्हाला कोणी भेटण्यासाठी बोलावत असेल, तर कृपया एकटे जाऊ नका. तुमच्यासोबत मित्र-मैत्रीण किंवा आई-वडील यांपैकी कोणाला तरी घेऊन जा. कारण कदाचित तुमच्या प्रोफाइलमधील माहिती वाचून सायबर गुन्हेगार तुम्हाला भेटायला बोलावू शकतात. तसेच शक्‍यतो पहिल्याच भेटीत आपले जीवन समोरच्या व्यक्‍तीसमोर उलगडू नका.
फिशिंग हे सर्वज्ञात झाले आहे. कारण हल्ली सर्वच जण ऑनलाइन बॅंकिंग वापरतात. फिशिंग म्हणजे तुमच्या बॅंकेच्या वेबसाइटसारखी दिसणारी दुसरी बॅंक अथवा तुमचीच बॅंक आहे अशी भासवणारी वेबसाइटची लिंक ई-मेलच्या माध्यमातून पाठवली जाते. त्या लिंकवर क्‍लिक केल्यावर तुमच्या बॅंक खात्याची माहिती मागितली जाते आणि पुढे आपल्या खात्यातील रक्कम लंपास केली जाते. “फिशिंग’पासून बचाव करण्यासाठी तुमचा इंटरनेट ब्राउझर (गुगल क्रोम, सफारी, इंटरनेट एक्‍सप्लोरर इत्यादी) हा नेहमी “इन कॉग्निटो मोड’मध्ये उघडा.

तुमच्या ब्राउझरमध्ये जो बुकमार्क असतो, त्यात तुमच्या बॅंकेची वेबसाइट सेव्ह करून ठेवा. प्रत्येक वेळा ती वेबसाइट ओपन केल्यावर त्यावर https आणि त्याच्या डावीकडे कुलपाचे चिन्ह दिसत आहे का ते पाहावे. बॅंक कधीही तुमची वैयक्‍तिक माहिती मागत नाही आणि जर कधी मागितली तर ती देताना शंभर वेळा विचार करा. संशय आल्यास आपल्या बॅंकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा. मोबाइल फोन बॅंकिंग करताना जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत होत नाही, तुम्हाला आत्मविश्‍वास येत नाही, तोपर्यंत फोन बॅंकिंग टाळावे. तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती होत नाही, तोपर्यंत मोबाइलवर येणारे बॅंकांचे सर्व कॉल्स टाळावे. जो मोबाइल तुम्ही वापरता तो घरातील इतरही व्यक्‍ती वापरत असतील, तर मोबाइल बॅंकिंगचे ऍप डाऊन लोडही करू नका. एकूणच मोबाइल बॅंकिंग पूर्णपणे टाळा.

– अॅड. प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)