डिजिटल डिस्प्लेंविरोधात मनसेचे आंदोलन

पुणे – स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात उभारलेले “व्हीएमडी’ अर्थात व्हिज्युअल मोलेक्‍युलर डायनामिक्‍स बोर्ड बेकायदेशीररित्या उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अशा बोर्डावर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेने महापालिका मुख्यसभा सुरू असताना आंदोलन केले.

यावेळी महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त तुषार दौंडकर यांच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आले. मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, राम बोरकर, प्रल्हाद गवळी, सुधीर धावडे, प्रशांत मते, आशिष देवधर, राहुल गवळी, चंद्रकांत गोगावले, सुनील कदम, मनविसेनेचे विक्रांत अमराळे, आशिष साबळे, महिला आघाडीच्या रुपाली पाटील, सुरेखा होले, लावण्या शिंदे, वाहतूक सेनेचे गणेश नायकवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)