डिजिटल कौशल्ये आवश्यक असलेल्या नोकऱ्यांमध्ये २०१८ सालच्या पहिल्या सहामाहीत वाढ

कल्याण, बेंगळुरू आणि गुरूग्राम या शहरांना अन्य शहरांतील बहुसंख्य प्रतिभावंतांचा लाभ

लिंक्डइन LinkedIn या जगातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक नेटवर्कने आज आपला पहिला मनुष्यबळ अहवाल (व्यावसायिक आवृत्ती) भारतात प्रकाशित केला. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रतिभेच्या परिसंस्थेला चालना देणा-या घटकांबद्दल हा अहवाल माहिती पुरवतो.

-Ads-

५० दशलक्ष सदस्य, ५०,००० कौशल्ये आणि १० लाख कंपन्या ज्या प्लॅटफॉर्मवर आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरील अॅनॉनिमाइझ्ड (नावाशिवाय) आणि एकत्रित अशा विस्तृत डेटा संचांचे विश्लेषण करून सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या/कौशल्ये आणि सर्वाधिक संधी असलेले भौगोलिक प्रदेश आदी महत्त्वाच्या प्रवाहांवर या अहवालाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. लिंक्डइनच्या वर्षातून दोनदा प्रसिद्ध होणा-या या अहवालात राष्ट्रीय विभाग तसेच प्रादेशिक विभाग आहेत. यातील प्रादेशिक विभागात भारतातील १४ महानगर भागातील स्थानिक प्रवाहांची माहिती दिली आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, पुणे, चंडीगढ, गुरूग्राम, जयपूर, कल्याण, कोची आणि नोएडा हे १४ विभाग आहेत.

प्रत्येक क्षेत्रातील लोकांच्या हालचालींचा निव्वळ आकडा एक दिशादर्शक घटक म्हणून वापरला असता (लिंक्डइन प्रोफाइल्सच्या निरीक्षणातून आलेला), २०१७ मधील पहिल्या सहामाहीशी तुलना करता उद्योगातील वाढीचे दर कमी आहेत असे आढळून आले. अभ्यासलेल्या १४ शहरांपैकी ७ शहरांमध्ये, उद्योगक्षेत्रांमधील वाढीबाबत शैक्षणिक क्षेत्र आघाडीवर आहे. या कालावधीत मर्यादित स्वरूपात तरीही वेगाने वाढ झालेल्या उद्योगक्षेत्रांमध्ये बांधकाम, सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा, वित्त, उत्पादन, कॉर्पोरेट सेवा, वाहतूक व लॉजिस्टिक्स, रिक्रिएशन आणि पर्यटन तसेच आरोग्यसेवा यांचा समावेश होतो. कंपन्यांनी पोस्ट केलेल्या नोक-यांनुसार, २०१८च्या पहिल्या सहामाहीत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज सर्वाधिक होती. त्यापाठोपाठ अॅप्लिकेशन डेव्हलपर्स, सोल्युशन्स कन्सल्टण्ट्स, जावा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, बिझनेस अॅनालिस्ट्स यांच्यासाठी मागणी होती. १४ पैकी ८ शहरांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी सर्वाधिक जॉब पोस्ट्स झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)