डिकसळ येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

सुपा – पारनेर तालुक्‍यातील डिकसळ येथे छत्रपती करंडक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाली. उद्‌घाटन मृत्युंजय ग्रुपचे अध्यक्ष गणेश काळे, शिवसेना नेते नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्पर्धेसाठी आलेल्या संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला. विजेत्या संघांना सरपंच गीताराम चौधरी यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. उपसरपंच शरद काकडे, सुजित गवळी, केतन मल्लाव, माजी सरपंच पंढरीनाथ चौधरी, सोपान चौधरी, सत्यम निमसे, प्रकाश गवळी, जयेश चौधरी, प्रीतेश पानमंद, अमोल कोरडे, डॉ. महेश आडसूळ, सचिन जऱ्हाड, सौरभ चौधरी, संकेत चौधरी, अक्षय चौधरी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)