डिअर पार्क प्रकल्पाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरु

पिंपरी – तळवडे येथे साकारणाऱ्या डिअर पार्क प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असुन त्यानंतर प्रकल्पाचा आराखडा निश्‍चित केला जाणार आहे. हा प्रकल्प 58 एकर जागेत असुन प्रकल्पाबाबत आयुक्त हर्डीकर यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी या प्रकल्पासाठी नियोजित असलेल्या गायरानाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे.

या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त केला असुन विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा डीपीआर तयार करण्यासाठी 16 लाख 80 हजार रुपये इतका खर्च येईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही कार्यवाही सुरु आहे. तसेच केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे. त्याचबरोबर यासाठी नागरिकांची मतेही जाणुन घेतली जाणार आहेत.

यासाठी आयुक्त हर्डीकर यांनी प्रकल्प आखणीसाठी प्रश्‍नावली तयार केली आहे. त्याच्या आधारावर सर्वेक्षण केले जाणार आहे. व तद्नंतर प्रकल्पाचा डीपीआर तयार करुन केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. प्रकल्पासाठी एकीकडे विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम सुरु असताना दुसरीकडे नगररचना विभागाकडून आवश्‍यक जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)