डिंगोरे विद्यालयात आंबेडकर जयंती साजरी

ओतूर-डिंगोरे (ता. जुन्नर) येथील पुष्पावती विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्‍त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जुन्नर तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, उपसरपंच गणेश ऊकिर्डे, मनोहर लोहोटे, अंकुश बनकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य विश्वास आमले, पांडुभाऊ मंडलिक, चंद्रकांत खरात, शिवाजी शेरकर, बबन आमले, मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, बी. व्ही. डुंबरे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे यांनी केले. तर शिक्षक प्रतिनिधी अनिल ऊकिर्डे यांनी आभार मानले. या कार्यकमाचे प्रास्ताविक शिवाजी अस्वार यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)