डिंगोरेत माय-लेक जखमी

file photo

ओतूर- डिंगोरे येथे दुचाकीवर हल्ला करुन बिबट्याने दुचाकिस्वार माय-लेकाला जखमी केले आहे. तर हल्ला केल्यानंतरही बिबट्याने त्यांच्या दुचाकिचा दोनशे मीटरपर्यंत पाटलाग केला. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगल विठ्ठल कुमकर (वय 50), दिनेश विठ्ठल कुमकर (वय 31, दोघ रा. कोळवाडी, ता. जुन्नर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.
ओतूर वनविभागाचे वनरक्षक सुदाम राठोड म्हणाले की ,योगेश कुमकर व मंगल कुमकर हे दुचाकीने कोळवाडीला जाता असताना डिंगोरे येथील कालव्या जवळ बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात दुचाकिवर मागे बसलेल्या मंगल कुमकर यांना बिबट्याचे पायाला तीन ठिकाणी दात व नखे लागल्या तर दिनेश यास ही बिबट्याची नखी लागल्याने जखम झाले. मात्र दिनेश यांनी प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता तशीच पुढे जोरात नेली, चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकिचा दोनशे मिटरपर्यंत पाठलाग केला. रात्र असल्याने दिनेश याने कुठेच मध्ये न थांबता दोघे ही जखमी असूनही कोळवाडीला घरी पोहोचले. त्यानंतर जखमीना तातडीने ओतूर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आनण्यात आले. प्राथमिक उपचारकरून त्यांना बिबट प्रतिबंध लस देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रूग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, या परिसरात बिबट्याच्या सततच्या होणाऱ्या हल्ल्‌यामुळे नागरिकांमधे भितीचे वातावरण पसरले असून नागरिक रात्रीच्यावेळी घराबाहेर पडायला घाबरत असून ओतूर वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्वरीत कार्यवाही झाली नाही तर डिंगोरे गावातील ग्रामस्थ रास्ता रोको करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)