डिंगोरेत अवैध दारूविक्रेत्याला महिलांनी पकडले!

ओतूर- जुन्नर तालुक्‍यातील डिंगोरे गावच्या हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याने येथील महिलांनी एकत्रित येऊन संबंधित हॉटेल चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पोलीस काय कारवाई करतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी हॉटेल मालक बाळु बबन नायकोडीला दारूच्या बाटल्यांसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ओतूर पोलिसांनी त्यास नोटीस देऊन सोडून दिल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले.
डिंगोरे परिसरात हॉटेलवर अवैध दारूविक्री होत असून दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी ओतूर पोलिसांना महिलांनी निवेदन दिले होते. निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर येथील स्थानिक महिलांनी एकत्र येऊन कारवाई केली. ओतूर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून दिलेल्या लेखी निवेदनानंतर पोलिसांनी कारवाईचा दिखाऊपणा केला. त्यामुळे डिंगोरे येथील महिलांनी पुढाकार घेऊन येथील हॉटेल शिवशाहीवर छापा टाकून अवैध दारूच्या देशी-विदेशी कंपनीच्या बाटल्या पकडल्या. पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई न केल्यामुळे ओतूर पोलिसांबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल चालकांला महिलानी रंगेहात पकडले. पोलिसांना नाईलाजास्तव इच्छा नसतानाही कारवाई करावी लागली.

  • आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
    नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे येथील हॉटेल शिवशाही येथे अनेक दिवसांपासून देशी-विदेशी कंपनीची अवैध दारू विक्री होत होती. स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांनी या ठिकाणी धाड टाकली. डिंगोरे गावात अवैद्य दारुविक्री हॉटेलवर महिला आणि ग्रामस्थांचा हल्लाबोल, दारू बाटल्यासह पकडून दिले. पोलिसांना ही नाईलाजास्तव कारवाई करावी लागल्याचे समजत होते. या आधीही पोलिसांकडून पंटर केस करून कारवाईचा फार्स केला होता. दारू बंदी असलेल्या गावात पोलिसांच्या आशीर्वादानेच ही दारूविक्री चालू असून पिंपरी पेंढार ते मढ दरम्यान कित्येक हॉटेलवर अशी विनापरवाना दारूविक्री बिनधिक्‍त सुरू आहे. मात्र, दीप अमावस्येला डिंगोरे गावातील महिलांनी एकत्रित येऊन विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. त्यामुळे तरूण पीढीला व्यवसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. मात्र, पुढील काळात ओतूर पोलीस याबाबत काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.
  • असा केला हल्लाबोल…
    डिंगोरे (ता.जुन्नर) या गावात 1989 मध्ये तत्कालीन महिला सरपंच लिलाबाई सुकाळे यांनी ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने दारूबंदी केली आहे. पोलीस आणि शासकिय उदासीनतेमुळे तसेच खाऊगिरीमुळे ती दारुबंदी टिकवण्यासाठी त्यांना आजही झगडावे लागत आहे. डिंगोरे ग्रामपंचायतने लेखी स्वरुपात ओतूर पोलिसांना गावच्या हद्दीत हॉटेलांमध्ये अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती देऊन ती बंद व्हावी म्हणून अर्ज दिला होता. मात्र, ओतूर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी (दि.11) रात्री माजी सरपंच लिलाबाई सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अस्मिता थापेकर, भाजप महिला आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाताई डुंबरे, माजी उपसरपंच मनोहर लोहोटे, तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर खरात, सदस्य मुरलीधर उकिर्डे, अंकुश थापेकर आदी ग्रामस्थ तसेच महिलांनी मिळून ह्या हॉटेलवर हल्लाबोल केला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)