डास आणि भटक्‍या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे लालू त्रस्त

रांची – येथील रूग्णालयात दाखल असलेले राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे डास आणि भटक्‍या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांनी रूग्णालयाच्या दुसऱ्या वॉर्डात हलवण्याची मागणी केली आहे.

चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत दोषी ठरवत लालूंना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरूंगवास भोगत असलेल्या लालूंना आजारपणामुळे रांचीमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वच्छता, डास आणि भटक्‍या कुत्र्यांचे कारण देत त्यांनी आता दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात यावे, अशी विनंती करणारा अर्ज रूग्णालयाच्या संचालकांकडे सादर केला आहे.

सांडपाणी वाहून नेणारा पाईप लालूंच्या वॉर्डजवळ आहे. त्यातून दुर्गंधी पसरते. वॉर्डच्या जवळच शवविच्छेदनाचा कक्ष असल्याने तिथे भटक्‍या कुत्र्यांचा संचार असतो. मधुमेह असल्याने लालूंना नियमितपणे चालण्याचा व्यायाम करावा लागतो. मात्र, सध्याचा वॉर्ड त्यासाठी योग्य नाही. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या वॉर्डमध्ये लालूंना हलवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी भाडे आणि इतर शुल्क देण्याची आमची तयारी आहे, असे राजदचे नेते भोला यादव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)