डाळी कडाडल्या

दुष्काळ परिस्थितीचा परिणाम

पुणे – दुष्काळ परिस्थितीचा फटका डाळींना बसला आहे. पंधरा दिवसांत हरभराडाळ, उडीदडाळ, तुरडाळ आणि मुगडाळीच्या भावांत मार्केट यार्डातील घाऊक बाजारात प्रती क्विंटल 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर, मसुरडाळीच्या भावात क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती डाळीचे व्यापारी विजय राठोड यांनी दिली. ज्वारीनंतर डाळीही महागल्याने सर्वसामान्य आता मेताकुटीला आले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे डाळींचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात होते. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने डाळींच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डाळीचे भाव कडाडले आहेत. गेल्या आठवड्यात सर्वच डाळींचे भाव वाढले होते. त्यानंतर त्यात भाववाढ सुरूच असल्याचे राठोड यांनी सांगितले आहे.

नेहमीच्या तुलनेत 60 ते 70 टक्‍केच मागणी
यंदा दिवाळीत गेल्यावर्षीच्या तुलनेत डाळींना मागणी कमीच राहिली असून, नेहमीच्या तुलनेत केवल 60 ते 70 टक्‍केच मागणी होती. ती पण दिवाळीपूर्वीच्या आठ ते दहा दिवसांत खरेदी झाली आहे. एकंदरीत परिस्थितीच विचार केल्यास डाळी व्यापाऱ्यांत मंदीचे वातावरण आहे. मंगळवारी (दि. 6 ऑक्‍टोबर) मार्केट यार्डातील भुसार बाजारात हरभराडाळ 5 हजार 800 ते 6 हजार रुपये, उडीदडाळ 6 हजार 500 ते 7 हजार रुपये, तुरडाळ 6 हजार 500 ते 7 हजार 100 रुपये, मुगडाळ 7 हजार ते 7 हजार 200 रुपये, मसुरडाळ 5 हजार 200 ते 5 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत आहेत. तर किरकोळ बाजारात हरभराडाळ 65 ते 70 रुपये, उडीदडाळ 70 ते 80 रुपये, तुरडाळ 70 ते 80 रुपये, मुगडाळ 80 ते 90 रुपये प्रतिकिलो भावाने विकली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)