डाळींब येथे नापास विद्यार्थाची गळफास घेऊन आत्महत्या

यवत- बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्‍यातून विद्यार्थाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.30) सायंकाळच्या सुमारास समोर आली आहे. ही घटना दौंड तालुक्‍यातील डाळींब येथे घडली आहे. या घटनेत प्रकाश सोपान म्हस्के (वय 18, रा.डाळींब, ता. दौंड, जि. पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रकाश हा उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होता. त्याने बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला होता. त्यात प्रकाश नापास झाला. नापास झाल्याच्या नैराश्‍यातून प्रकाशने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रकाश यास पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी प्रकाश यास मृत घोषित केले. प्रकाश याचे वडील सोपान गेनबा म्हस्के यांनी यवत पोलिसांना घटनेची माहिती दिली असून यवत पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रकाश याचा स्वभाव शांत व मनमिळावू होता. प्रकाश याने घेतलेल्या आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार लोणकर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)