डाळींचे पडते भाव रोखण्यासाठी मध्यप्रदेशने सुरू केली खरेदी

जयपूर : डाळींचे सतत पडत असलेले भाव रोखण्यासाठी मध्यप्रदेश राज्य सरकारने इंदौर येथे १० एप्रिलपासून चणा, मसूर आणि मोहरीची खरेदी सुरू केली आहे. खरेदीची ही प्रक्रिया ९ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

राज्य सरकार सध्या थेट शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत दराने ही खरेदी करत असून त्यासोबत अतिरिक्त १०० रु./क्विंटलप्रमाणे बोनस दिला जात आहे.

-Ads-

शासनाकडून केल्या जाणाऱ्या या खरेदीमुळे सुमारे ५०,००० शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यात चण्यासाठी किमान आधारभूत किंमत ४,४०० रु./क्विंटल, मसूर- ४,२५० रु. /क्विंटल आणि मोहरीला ४,००० रु./क्विंटलचा भाव निश्चित करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)