डाळींची निर्यात एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान १८% वाढली

नवी दिल्ली : सुमारे दशकभरानंतर केंद्राने परदेशातील निर्यातीवरील निर्बंध मागील नोव्हेंबरमध्ये हटवल्यानंतर आता डाळींची निर्यात वाढणे सुरू झाले.

कृषि आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण यांच्याकडील माहितीनुसार, डाळींची जहाजवाहतूक एप्रिल-फेब्रुवारी २०१७-१८ यादरम्यान दरवर्षीच्या तुलनेत १८% वाढली आहे. या दरम्यान सुमारे १.३४ लाख टन डाळींची निर्यात करण्यात आली आहे. किंमतीच्या दृष्टीने या प्रमाणात १५% वाढ होऊन ते $१८३ बिलियन इतके राहिले.

-Ads-

काबुली चणा वगळता चणा डाळ आणि मूग डाळ यासारख्या डाळी जहाजामार्फत पाठवल्या जात असून. यात काही प्रमाणात बांगलादेश आणि श्रीलंका या देशांतून मागणी आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)