डाळिंबाचे बहार

स्नेहल खलाटे

बहार धरणे म्हणजे काय ?
बागेचे पाणी तोडून झाडांना विश्रांती देवून व त्याची शाकीय वाढ थांबवून, एकाचवेळी झाडांना जास्त फुलोरा आणणे याला बहार धरणे असे म्हणतात
बहाराचे प्रकार :-
डाळिबाचे झाडे उत्तर भारतात हिवाळ्यात सुप्त अवस्थेत जातात व नंतर मार्चमध्ये त्यांना फुले येतात तिकडील फळे, फुले ऑगस्टमध्ये पिकतात. मध्य व दक्षिण भारतात मात्र व्यवस्थित पाणी मिळाल्यास डाळीबाच्या झाडांना वर्षभर फुले येतात. परंतु ती फुले तीन ऋतूत येतात.
1) मृग बहार :- मृग नक्षत्राच्या आसपास म्हणजेच
जून – जुलैमध्ये फुले येतात.
2) हस्तबहार :- हस्त नक्षत्राच्या आसपास
म्हणजेच सप्टेंबर ऑक्‍टोबर मध्ये फुले येतात.
3) आंबेबहार :- आंब्याला फुले येतात त्यावेळेस
म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी मध्ये फुले येतात.
ह्याशिवाय डाळिबाला इतर वेळेसही भरपूर फुले येतात. त्याला आड बहार म्हणतात असे म्हणतात. उदा. ऑगस्ट महिन्यात व मार्च एप्रिल महिन्यात फुले येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणता बहार धरावा?
डाळींबाला कोणता बहार धरावा हे खालील गोष्टींवर अवलंबून आहे.
1) पाण्याची उपलब्धता
2) जमिनीचा प्रकार
3) हवामान बागेच्या परीसरातील
4) देशांतर्गत बाजारभाव व परदेशातील मागणी
मृगबहाराचे फायदे:-
1) ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याची सोय नसते, त्या ठिकाणी मृगबहार धरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण मृग बहार धरताना उन्हाळ्यात पाणी तोडावे लागेल तसेच पावसाळ्यात पावसामुळे वरचे पाणी भरण्याची आवश्‍यकता कमी होते.
2) पावसाचे प्रमाण ज्या भागात कमी असते त्या ठिकाणी मृग बहार धरल्यास चालतो.
3) बागेला ताण व्यवस्थित बसल्याने फुले व फळे भरपूर लागतात.
मृगबहारचे तोटे :-
1) पावसाळ्यात पावसामुळे फळावर व बागेवर रोग व किडीचे प्रमाण जास्त असते.

हस्तबहारचे फायदे :-
1) हस्त बहाराची फळे साधारणतः जागेवारी ते मार्च एप्रिल पर्यंत निघतात. ह्या वेळेस थंडीमुळे फळांना व दाण्यांना आकर्षक भाव बाजारात मिळतो. फळे वाढताना हवामान कोरडे व स्वच्छ असल्याने रोगराई व किडीचे प्रमाण कमी असते.
हस्तबहाराचे तोटे:-
1) हा बहार धरताना पावसामुळे व जमिनीतील ओलाव्यामुळे बागेला ताण व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे ह्या बहाराला फुले व फळे फार कमी प्रमाणात लागतात भारी जमिनीमध्ये तर हा प्रश्‍न जास्त भेडसावतो.
2) बागेस ताण व्यवस्थित न बसल्यामुळे बहार पुढे मोठा लागतो. त्यामुळे फळांचा हंगामही लांबतो.
आंबेबहारचे फायदे:-
1) आंबेबहाराच्या फळाची वाढ होत असताना हवामन उष्ण व कोरडे असते. म्हणून फळांवर रोग व किडीचे प्रमाण कमी असते. मात्र उशिरा आंबेबहार धरल्यास ती फळे पावसाळ्यात पिकतात व त्यावेळेस रोग व किडी येतात.
2) आंबेबहरातील फळांना गोडी जास्त असते.
3) बागेला ताण व्यवस्थित बसल्यामुळे फुले व फळे भरपूर लागतात

आंबेबहाराचे तोटे:-
1) उन्हाळ्यात बागेला वारंवार पाणी द्यावे लागते.
2) उन्हामुळे फळांना तपकिरी किंवा काळसर चट्टा पडतो. त्यामुळे बाजारात कमी भाव मिळतो.
3) काही प्रमाणात फळामध्ये काळे दाणे आढळून येतात.
3) हि फळे मे पासून पिकायला सुरुवात होते. त्यावेळेस अती उष्णतेमुळे फळांना चांगला रंग येतनाही. ते पांढरे किंवा फिकट गुलाबाची राहतात.त्यामुळे फळांना अत्यंत कमी भाव मिळतो.
4) उन्हाळ्यात बागेला पाणी कमी पडले तर फळधारणेवर, फळाच्या वाढीवर, उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
5) ही फळे पावसाळ्यात पिकतात. पावसाचा किंवा पाण्याच अनियमितपणा झाल्यास फळांना तडे पडतात.बहार घरण्यासाठी बाणेचे पाणी केव्हा बंद करावे.
6) मृगबहार :- मृगबहार धरावयाचा असल्यास बागेचे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार व तापमानानुसार एप्रिल-मे महिन्यात ते महिने तोडावे.
7) हस्तबहार : पावसामुळे हस्तबहार धरणे सहसा जमत नाही. जर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचा ताण पडता असेल त्यावेळेस हा बहार धरावा.
8) आंबेबहारः -बहार धरण्याअगोदर अडीच ते तीन महिने बागेचे पाणी तोडावे.

बहार धरताना घ्यावयाची काळजी :-
झाडावरील व झाडाखालील किडकी व सडकी फळे वेबून नसत
करावीत. बागेत नांगरणी वखरणी करुण घ्यावी.झाडांची हलकी व मध्यम छाटणी करून घ्यावी. बागेमधील ताने काढून स्वच्छ ठेवावे व बागेची बांधणी करून घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)