डाळज येथील खूनप्रकरणी तिघांना कोठडी

भिगवण- भिगवण नजीक डाळज नंबर 1 (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 10) रात्री एका 40 ते 45 वर्षांच्या व्यक्‍तीचा खून झाला होता. भिगवण पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास करीत तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल उर्फ भावड्या मच्छिंद्र जाधव (वय 23), दिलीप बाळासाहेब जाधव वय 24, दोघे रा. डाळज नं 2 ता. इंदापूर), गोपाळ वामन जाधव (वय 26, रा. बोरी, ता. इंदापूर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री डाळज नंबर 1 (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या कडेला काही अज्ञात व्यक्‍तींनी 40 ते 45 वयोगटातील व्यक्‍तीच्या डोके, खांदा, पायाला जबर मारहाण करून त्याचा खून केला होता. तर पुरावा नष्ट करण्यासाठी नग्न अवस्थेत त्याचा मृतदेह टाकून दिला होता. त्यामुळे मृताची ओळख पटविणे अवघड झाले होते. त्यामुळे भिगवण पोलीस गुन्हे शाखा व बारामती गुन्हे शाखा यांच्या संयुक्‍त तपासासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या, त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सोमवारी रात्री त्या भागात एक मोटारसायकल फिरत होती त्यावर नंबर प्लेट नव्हती त्यावर फक्‍त दोस्ती असे नाव लिहलेले होते, त्यावरून तपास करीत या टीमने राहुल जाधव यास संशयित म्हणून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्‍या दाखवताच तो पोपटा सारखा बोलू लागला व हे कृत्य आपण दिलीप जाधव, गोपाळ जाधव यांच्यासमवेत केले असे सांगितल्यानंतर या दोघांच्याही मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर अधिक तपास केला असता राहुल जाधव हा डाळज भागात रसत्यात अनोळखी व्यक्‍तीस आडून चिरीमिरीसाठी चोऱ्या करीत होता, त्याच्यावरती भिगवण पोलिसांत किरकोळ चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास एक अनोखी व्यक्‍ती रस्त्याने जाताना राहुलने त्यास आडवून लुटण्याचा प्रकार केला. त्यावेळी त्या व्यक्‍तीने त्यास प्रतिकार केला असता राहुलने दिलीप व गोपाळ याला बोलाऊन त्या व्यक्‍तीस बेदम मारहाण केली, त्यात त्या अनोळखी व्यक्‍तीचा मृतू झाला. त्याचा मृतू झाला हे लक्षात येताच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्याचा नग्न मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून हे आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या तिघांच्या मुसक्‍या आवळ्या आहेत.

  • मृताची ओळख पटलेली नाही
    दोस्ताच्या मदतीने एका अनोळखी व्यक्‍तीचा खून केला, पण अखेर दोस्तीनेच त्यांना पोलिसांचे जाळ्यात अलगद अडकवले. दरम्यान, या घटनेतील मृताची अद्याप ओळख पटली नसल्याने त्याबाबत कोणास काही माहिती असल्यास किंवा माहिती झाल्यास भिगवण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)