डार्क स्किनचे फायदे?

सावळ्या किंवा डार्क स्किनला नेहमीच वाईट समजलं जातं. सावळ्या रंगांच्या लोकांनी काळं म्हणून चिडवलं जातं. सावळेपणामुळे अनेकांना अनेक प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेकांना यामुळे डिप्रेशन येतं. याचाच परिणाम म्हणजे सावळा रंग घालवण्यासाठी आणि गोरा रंग मिळवण्यासाठी हजारो रुपयांच्या क्रिम बाजारातून विकत घेतल्या जातात. त्यामुळे गोरा रंग देणाऱ्या क्रिमचं मार्केट वाढलं आहे. मात्र, सावळा रंग किंवा डार्क रंग असणं वाईट नाहीतर फायद्याचा आहे. चला जाणून घेऊया डार्क स्किनचे फायदे.
सावळ्या किंवा डार्क स्किनमध्ये कलर पिगमेंट मेलानिनचं प्रमाण जास्त असतं, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया काही फायदे.
प डार्क स्किनमध्ये मेलानिनचं प्रमाण अधिक असतं. ते सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा-व्हायलेट किरणांपासून आपला बचाव करतं.
प स्किनमध्ये असलेल्या डार्क पिग्मेंटेशनमुळे गो-या स्किनच्या तुलनेत स्किन कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.
प डार्क स्किनमध्ये असलेल्या मेलानिन सेंट्रल नर्व्हस सिस्टमला नुकसान पोहोचवणाऱ्या खतरनाक पॅरासाईटपासून आपली रक्षा करतं.
प मेलानिन इन्फेक्‍शन पसरवणाऱ्या बॅक्‍टेरियापासून बचाव करतो. गोऱ्या स्किनच्या तुलनेत स्कीन इन्फेक्‍शन कमी होतात.
प डार्क स्किनमध्ये असलेलं मेलानिन स्किनवर सुरकुत्या येण्यापासून रोखतं. त्यामुळे तुम्ही अधिक यंग आणि ताजेतवाने दिसता.
प मेलानिनमुळे शरीराची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारकशक्‍ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारखे रोग होत नाहीत.
प मेलानिन महिलांमध्ये हेल्दी एग प्रॉडक्‍शनमध्ये मदत करतो. यामुळे प्रेग्नसी संबंधित अनेक समस्यांपासून सुरक्षा मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)