पुणे : ‘डायलेसिस सेंटर’च्या प्रस्तावावर ‘मतदान नाट्य’

कॉंग्रेसची माघार


न्यायालयात जाण्याचा दिला होता इशारा

पुणे – कोठारी चॅरिटेबल ट्रस्टला डायलेसिस सेंटर सुरू करण्याला देण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी महापालिका मुख्यसभेत मतदानाचे नाट्य घडले. हा विषय मंजूर केला, तर न्यायालयात जाऊ अशी वल्गना करणाऱ्या कॉंग्रेसजनांनी मात्र या प्रस्तावावर पुकारलेल्या मतदानात तटस्थ भूमिका घेतली.

महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोठारी चॅरिटेबल ट्रस्टला येरवडा भागातील राजीव गांधी रुग्णालयातील डायलसिस सेंटर 5 वर्षांसाठी चालवायला देण्याचा प्रस्ताव महापालिका मुख्यसभेत मंजुरीसाठी आला होता. केवळ 400 रुपयांत डायलिसिस करण्याचा हा प्रस्ताव होता. त्यावर बराच वादंग सभेत झाला.

-Ads-

याच रुग्णालयाला का चालवायला द्यायचे, अन्य मोफत डायलिसिस करण्याला तयार असणारे चॅरिटेबल ट्रस्ट नाहीत का, असा सवाल कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला.
हा प्रस्ताव सभासदांनी दिल्याचे सहाय्यक आरोग्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा विषय करण्याबाबत सत्ताधाऱ्यांनी आग्रह धरला. त्यावर आमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. यावर बराच वाद झाल्यानंतर महापौरांनी या विषयावर मतदान पुकारले.

त्यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीने विरोधात मतदान करण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे 68 विरुद्ध शून्य मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)