डायमंड लिग मध्ये निरज चोप्राला कांस्यपदकाची हुलकावणी

झ्युरिच: आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू निरज चोप्राला मानाच्या डायमंड लिग स्पर्धेत कांस्यपदकाने थोडक्‍यात हुलकावणी दिली असून चोप्राला त्याच्या राष्ट्रीय विक्रमाचीही बरोबरी करता न आल्याने त्याला स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

20 वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.73 मीटर भालाफेक केली. मात्र, जर्मनीच्या थॉमस रोहलरने सहाव्या प्रयत्नात 85.76 मीटर भालाफेक करून कांस्यपदक नावावर केले. जर्मनीच्या आंद्रेस होफमन ( 91.44 मी.) व इस्टोनियाच्या ( 87.57 मी.) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.

आणि त्या मुळे इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्राचं मानाच्या डायमंड लिग स्पर्धेत पदक हुकलं आहे. भालाफेकपटूंसाठी मानाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत नीरज चोप्राने अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं, मात्र काही गुणांच्या फरकामुळे नीरजला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

पाचव्या फेरीपर्यंत नीरज चोप्राने आपलं तिसरं स्थान कायम राखलं होतं. यामुळे नीरज चोप्राला कांस्यपदक मिळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली होती. मात्र जर्मनीच्या थॉमस रोहलरने 85.76 मी. लांब भाला फेकत नीरजला धक्का दिला. यानंतर अखेरच्या संघीत नीरजचा भाला 85.73 इतकीच मजल मारु शकला. त्यामुळे काही गुणांच्या फरकामुळे नीरजला हातात आलेलं कांस्यपदक गमवावं लागलं. या स्पर्धेत नीरज आपल्या राष्ट्रीय विक्रमाशीही बरोबरी करु शकला नाही.

भारताच्या 20 वर्षीय निरजने तिनच दिवसांपुर्वी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती त्यामुळे आज त्याच्या कडून किमान कांस्यपदकाची अपेक्षा केली जात होती, मात्र त्याला या स्पर्धेत आपला भाला जास्तित जास्त 85.73 मिटर लांब पर्यंतच फेकता आला आणि त्याला केवळ 0.03 गुणांनी आपले कांस्यपदक गमवावे लागले आहे. तिनच दिवसांपुर्वी निरजने 88.06 मिटर लांब पर्यंत भाला फेकत सुवर्णाची कमाई केली होती. मात्र आज त्याला आपल्या कर्तुत्वास साजेशी खेळी करता आली नाही त्या मुळे त्याला चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.

आता या नंतर चेक प्रजासत्ताक येथे 8 व 9 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या कॉंटीनेंटल चषक स्पर्धेत नीरज सहभागी होणार आहे. त्याच्यासह या स्पर्धेत मोहम्मद अनास ( 400 मी.), जिन्सन जॉन्सन ( 800 मी.), अरपिंदर सिंग ( तिहेरी उडी), हिमा दास ( 400 मी.), पी. यू. चित्रा ( 1500 मी.) आणि सुधा सिंग (3000 मी. स्टीपलचेस) हे भारतीय खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)