‘डायन’ या एकताच्या नव्या भयकथेत झळकणार टिना दत्ता

काही वर्षांपूर्वी ‘उतरन’ या मालिकेतील छोटीशी इच्छा आठवतेय का? आपण ही लोकप्रिय व्यक्तिरेखा आजही आठवू शकतो याचे एक कारण म्हणजे ती भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री टीना दत्ता. या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे ती अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाली आणि प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम तिला लाभले. त्यानंतरही विविध कार्यक्रमांतून ती आपल्या चाहत्यांना आनंद देत राहिली. आता ती परत आली आहे… कशी? या देखण्या अभिनेत्रीने &TVवरील एकता कपूरच्या नव्या ‘डायन’ या कार्यक्रमात भूमिका मिळवली आहे. या मालिकेच्या निमित्ताने टिना पहिल्यांदाच रोमान्स प्रकारापासून दूर जात बालाजी टेलिफिल्म्सच्या या नव्या भय आणि गूढकथेत दिसणार आहे.

टिना जान्हवी मोर्य या तरुणीची भूमिका साकारतेय. उज्जैनमधील सुशिक्षित आणि कौटुंबिक विचारांची ही २२ वर्षीय तरुणी नवी दिल्लीत उच्च शिक्षणासाठी आली आहे. बालपणी तिच्यासोबत घडलेल्या काही सुपरनॅचरल घटनांमुळे या गूढ जगावर तिचा पक्का विश्वास आहे. दुष्ट शक्तींनी मांडलेल्या धोकादायक खेळात, तिच्या मूळ घरी अत्यंत असामान्य आणि गूढ घटना घडत असताना सरत्या वेळेशी ती कसा सामना करते, हा प्रवास ‘डायन’मधून प्रेक्षकांपुढे मांडला जाणार आहे. तिच्या जवळच्या व्यक्तींमध्येच लपलेल्या डायनला शोधणे आणि या दुष्ट शक्तीचा पराभव करण्याचा हा तिचा प्रवास आहे.

या नव्या मालिकेचा भाग असण्‍याबाबत आणि ही भूमिका साकारण्‍याबद्दल टिना म्हणाली, “याआधीही मी काही परिणामकारक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, अगदी आजही प्रेक्षकांना आठवतील असे संस्मरणीय शो केले आहेत. पण, मी याआधी जे काही केले आहे त्यापेक्षा वेगळे आणि मला एक नवे आव्हान देणा-या मालिकेच्या मी शोधात होते. सध्या चलनात असलेल्या भयकथांची वाट डायनमध्ये धुंडाळली जाणर आहे. शिवाय, आपली अनोखी संकल्पना आणि पटकथा यामुळे ही मालिका ठरलेले साचे मोडेल. हे गूढ उकलण्याच्या प्रवासात माझी व्यक्तिरेखा, जान्हवीला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ते पाहून प्रेक्षकही तिला साथ देतील. एकता कपूर यांच्या कामाने कलाकारांना नेहमीच प्रेरणा मिळते. त्यांच्या कथा आणि त्यांचे सादरीकरण यांनी प्रेक्षकांवर नेहमीच छाप पाडली आहे. त्यांच्यासोबत ही माझी दुसरी मालिका आहे. पुन्हा एकदा बालाजी टेलिफिल्म्ससोबत आणि &TV सोबत नव्याने प्रवास सुरू करताना मला आनंद होत आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)