“डान्स’ची स्क्रीप्ट कतरिनाला आवडली नाही 

रेमो डिसोझाच्या आगामी “डान्स’च्या स्क्रीप्टबाबत कतरिना कैफला फार काही आनंद झालेला नाही. तिच्या म्हणण्यानुसार स्क्रीप्टमध्ये खूप बदल व्हायला पाहिजेत. तसे बदत तिने सुचवलेलेही आहेत. ही स्क्रीप्ट आपल्या म्हणण्यानुसार होत असेल, तर पुढचे काम करू असे तिने रेमो डिसोझाला कळवूनही टाकले आहे. रेमोने हे बदल करण्याची तयारीही दर्शवली आहे. “डान्स’मध्ये कतरिना आणि वरुण धवन असणार आहेत. कतरिनाप्रमाणे वरुण धवननेही स्क्रीप्टमध्ये बदल सुचवले होते. त्यानुसार स्क्रीप्टमध्ये बरेच बदल केलेही गेले होते.
मात्र आता कतरिनाने स्क्रीप्टबाबत नापसंती दर्शवल्यामुळे पुन्हा काही फेरबदल करायला लागणार आहेत. तिला मूळची स्क्रीप्टच जास्त आव्बडली होती. त्यामुळे आता नवीन आणि जुनी अशा दोन्ही स्क्रीप्टमधील काही काही भाग एकत्र करून नव्याने स्क्रीप्ट लिहीली जाण्याची तयारी सुरू आहे. या सिनेमाची घोषणा खूपच दिवसांपूर्वी झाली होती. मात्र अजून त्याच्या शुटिंगचा काहीच पत्ता नाही. आणखीन काही काळ तरी “डान्स’चे शुटिंग सुरू होणार नाही, हे निश्‍चित आहे. या सिनेमामध्ये डान्सला अधिक महत्व असणार हे उघड आहे. त्याचबरोबर म्युझिकलाही विशेष महत्व असणार आहे. त्यादृष्टीने काय हालचाली सुरू आहेत, हे थोड्या दिवसात समजेलच.
What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)