डाक कर्मचाऱ्यांच्या संपास प्रतिसाद

कराड – अखिल भारतीय डाक कर्मचारी दोन्ही संघटनेच्या वतीने विविध मागण्यांबाबत व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारी धोरणांवर आक्रोश व्यक्‍त करण्यासाठी दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे. कराड येथील मुख्य डाक कर्मचाऱ्यांच्या वतीनेही मंगळवारी सर्व कामकाज बंद करून या संपाला प्रतिसाद देण्यात आला.

डाक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे टपाल सेवा विस्कळित झाली होती. महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष कॉ. मोहन विभूते आणि सातारा जिल्हाध्यक्ष कॉ. प्रसाद बैले, तसेच नॅशनल युनियनचे अध्यक्ष मुनीर मनेर यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे. त्याचबरोबरच कामगार कपात, अतिरिक्त कामाचा वाढता ताण, अधिकारी वर्गाचा दबाव, इंटरनेट सेवेचा रोजचा उडणारा बोजवारा या सर्व संकटांनी टपाल कर्मचाऱ्यांची अवस्था मरणासन्न झाली आहे. सरकार विरोधी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याने संप पुकारण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वीही अनेकवेळा उपोषण करून आणि काळ्या फिती बांधून टपाल संघटनेने सरकारला इशारा दिला आहे. तरीही सरकारला जाग आलेली नसल्याने दोन दिवस पूर्ण कामकाज बंद ठेवण्यात आले. संपामध्ये सर्व पोस्टल कर्मचारी तसेच व्ही. बी. देसाई, मुनीर मनेर, व्ही. एस. दबडे, ए. व्ही. भोज, आर. व्ही. जाधव, अर्जुन लांडगे, प्रविण जाधवर, एन. बी. भोसिकर, आर. एम. राजमाने, ए. वाय. गायकवाड सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)