डाऊन पेमेंट स्वरूपात स्वीकारलेल्या लाखोंचा अपहार करणारा शोरूममधील विक्री व्यववस्थापक अटकेत

त्याला न्यायालयाने सुनावली 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) – विमाननगर येथील मारूती सुझुकीच्या शोरूममध्ये डाऊन पेमेंट स्वरूपात चार ग्राहकांनी भरलेल्या 5 लाख 51 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विक्री व्यवस्थापकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याला 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सनी नंदु धोत्रे (रा. कर्वेनगर. मूळ रा. मुंबई) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शोरूमचे एच आर अनिल बाबुराव गिरी (वय 43, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 5 ते 25 सप्टेंबर 2016 या कालावधीत विमाननगर, साकोरेनगर येथील दि कोठारी व्हिल नेक्‍सा या मारुती सुझुकीच्या शोरूम मध्ये घडली. धोत्रे हा शोरूमध्ये विक्री व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याने चार ग्राहकांकडून गाडी खरेदीसाठी 5 लाख 51 हजार रुपये डाऊन पेमेंट स्वरूपात स्विकारले. मात्र, घेतलेली ही रक्कम शोरूममध्ये न भरता तिचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी धोत्रे याला अटक करून न्यायलायात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, गुन्हा घडल्यापासून तो कोठे होता, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने धोत्रे याला 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)