डांबरी रस्त्यांची चाळण ; खड्ड्यांसाठी आठ कोटी

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी सेवा पुरवणाऱ्या कंपनींना महापालिका पायघड्या घालत आहे. रिलायन्स जिओने सेवा वाहिन्या भूमिगत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून दुरूस्त केलेले डांबरी रस्ते खोदून शहराची चाळण केली.

ई-प्रभागात खोदलेले चर बुजवण्यासाठी त्यासाठी पालिका आठ कोटींचा खर्च करत आहे. मोबाईल डेटा पुरवणाऱ्या कंपनींची स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी रिलायन्स जिओने ग्राहकांना खेचून घेण्यासाठी अफलातून ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये जिओ मोबाईल डेटा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक वेगाचा डेटा पुरवठा करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडून संपूर्ण शहरात नेटवर्कचे जाळे तयार केले जात आहे.

खोदाई केल्यानंतर संबंधित कंपनीकडून रस्त्यांची दुरूस्ती करीत नाही. त्यामुळे महापालिकेने खोदलेले रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. खोदलेल्या डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी जेट पॅचर पॉथोल पॅचिंग मशिनचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी 8 कोटी 32 लाख 41 हजार खर्चाची निविदा प्रसिध्द केली आहे. निविदा दरातील वाढ व घट यानुसार या कामासाठी मे. अंजनी लॉजिस्टिक संस्थेची नेमणूक केली आहे. सर्व प्रभागात केवळ रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी एवढ्या रकमेची उधळपट्टी केली जात आहे. संबंधित कंपनीला मात्र अभय मिळत आहे.

नागरिकांच्या पैशाचा अपव्यय
पिंपरी-चिंचवडच्या आठही प्रभागांमध्ये विविध सेवा वाहिन्या भूमिगत करण्यासाठी खोदाई केली जाते. सध्या रिलायन्स जिओ कंपनीच्या वाहिनी भूमिगत करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये डांबरी रस्त्यांची खोदाई केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या वाहिनी भूमिगत करण्यासाठीही काही भागामध्ये खोदाई केली आहे. जिओ कंपनीबरोबरच अन्य खासगी सेवा वाहिन्या भूमिगत केल्या जात आहेत. परंतु, खोदलेले खड्डे बुजविण्यासाठी संबंधित कंपन्यांकडून तसदी घेतली जात नाही. त्यामुळे शहरात येऊन कोणतीही कंपनी मनाप्रमाणे खोदाई करत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशातून तयार केलेल्या डांबरी रस्त्यांची चाळण केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)