डांगे चौकातील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

पिंपरी – हातगाडी, टेम्पो, पथारी व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांसह पदपथ, दुभाजक, बीआरटी या ठिकाणी विविध विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे थेरगाव, डांगे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तब्बल चार ते पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.

डांगे चौकात आजूबाजूच्या गावातील शेतकरी विक्रीसाठी येतात. मात्र, गेल्या काही वर्षात थेरगाव, डांगे चौक परिसरात हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांची लोकवस्ती वाढली आहे. हे कर्मचारी शनिवार, रविवारी फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी बाहेर पडतात. परिणामी, डांगे चौकातील वाहतूक समस्येमध्ये मोठी भर पडते. गणेशनगरहून डांगे चौकाच्या दिशेला रस्त्यालगत भाजीपाला, फळे, यासह विविध वस्तू विक्रीच्या हातगाड्या, टेम्पो लागलेल्या असतात. तर, डांगे चौकापासून ताथवडेकडे जाणारा मार्ग, ताथवडेकडून डांगेचौकाकडे येणाऱ्या मार्गावर रस्त्यामध्ये, पदपथांवर विक्रेते बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍कील होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रावेत-औंध बीआरटी मार्गातही विक्रेते बसतात. त्यांना हटविण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. गणेशनगरहून डांगे चौकाकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू असते. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. परिणामी, कोंडीत अधिकच भर पडते.

आठवडे बाजारात ताजी भाजी, फळे रास्त भावात मिळतात. त्यामुळे दर रविवारी येथे खरेदीसाठी येतो. मात्र, वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा नसते. महापालिका प्रशासनाने येथील बेकायदा विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी काळाखडक येथील नागरीक मकरंद पांडे यांनी केली तर गणेशनगर भागात गेल्या कित्येक वर्षापासून छोटे विक्रेते किरकोळ वस्तूंची विक्री करून उपजिविका करत आहेत. आता येथील लोकवस्ती वाढल्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कालावधी अनेकदा पालिकेकडे जागेची मागणी केली आहे. हॉकर्स धोरणांतर्गत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अद्याप कागदावर असल्याचे गणेशनगर व्यापारी संघटनेचे अभिनंदन बनसोडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)