डमी हमालांची दादागिरी सहन करणार नाही – डॉ. बाबा आढाव

पुणे- हमाल हा बाजाराचा कणा आहे. त्यांच्याशिवाय बाजार सुरु राहूच शकत नाही. मात्र, सध्या काही लोक डमी हमाल म्हणून काम करत आहेत. ते हमाल पंचायतीला डिवचण्याचे काम करीत आहेत. त्यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी दिला.
भुसार बाजारातील समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. आढाव बोलत होते. याप्रसंगी हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे, दि पुना मर्चटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सहसचिव
एन.डी. घुले आदी उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले की, गेल्या 60 वर्षांत अनेक घटना घडल्या आहेत. सध्या अनेक बोगस संघटना उभ्या राहिल्या आहेत. त्या प्रत्यक्षात काम करत नाहीत. हप्ते वुसली करतात. त्यामुळे खऱ्या संघटनेचे काम बदनाम होते. त्यामुळे सध्या हमाल पंचायतीला डिवचण्याचे काम सुरु आहे. बाजारातील सर्व घटक बाजार आवार स्वच्छ ठेवण्याचे काम करतील.
मेंगडे म्हणाले की, भुसार बाजारात 2200 ते 2300 हमाल कार्यरत आहेत. मात्र, त्यातील 1 हजार हमालांकडेच परवाना आहेत. या सर्वांना परवाने देण्यात येणार आहेत. मात्र, बाजारात डमी हमलांना काम करु देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान बाजार समितीचे सहायक सचिव एन.डी. घुले म्हणाले की, फळे आणि भाजीपाला विभागातील समस्या नवनिर्वाचित सचिव बी.ज़े.देशमुख यांनी सोडविल्या आहेत. त्याचप्रमाणे भुसार बाजारातील समस्याही सोडविण्यात येणार आहेत. बाजारात जवळपास 2300 हमाल काम करत आहेत. त्यातील बहुतेकांकडे परवाना नाही. त्यांनी तो घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय काम करता येणार नाही. बाजार समिती हमालांना ओखळपत्र देणार आहे. त्यानंतर डमी काम करणाऱ्या हमालांवर कारवाई केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)