डब्लूब्लूईचे मालक विन्स मॅक्मोहन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

न्यूयॉर्क : वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटचे (डब्लूब्लूई) मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विन्स मॅक्मोहन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मॅक्मोहन यांनी जानेवारी 2006 मध्ये किस आणि वाईट हेतून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप बोका रॅटनमधील टॅनिंग सलूनच्या महिला कर्मचाऱ्याने केला आहे.
या प्रकरणात पोलिस मॅक्मोहन यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. पण पुराव्यांच्या अभावी गुन्हा दाखल झाला नाही. सबळ पुराव्यांशिवाय मॅक्मोहन यांना दोषी सिद्ध करु शकत नाही, त्यामुळे गुन्हा दाखल व्हायला हवा, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. दुसरीकडे डब्लूडब्लूईच्या सीईओंनी महिलेचे आरोप फेटाळले आहेत.
संबंधित महिला घटनेच्या दिवशी मॅक्मोहन यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. तिच्या आरोपानुसार, “जानेवारी 2006 मध्ये मॅक्मोहन तंजाबार टॅनिंग सलूनमध्ये संध्याकाळी पाच वाजता आले होते. त्यावेळी ते 60 वर्षांचे असावेत. मॅक्मोहन यांनी महिलेला स्वत:चे न्यूड आणि सेमी न्यूड फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. “यानंतर मॅक्मोहन यांनी मला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे करताय ते चुकीचे आहे, असंही त्यांना सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही,” असा दावा महिलेने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)