“डब्लूटीओ’मधून बाहेर पडायची ट्रम्प यांची धमकी

वॉशिंग्टन – जागतिक व्यापार संघटनेने आपली रचना बदलली नाही, तर अमेरिका जागतिक पातळीवरील संघटनेतून बाहेर पडेल, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

गुरुवारी दिलेल्या एका मुलाखती दरम्यान ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने जागतिक पातळीवर उभ्या राहिलेल्या मोठ्या संघटनांच्या कार्यपद्धतीबाबत ट्रम्प यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. “डब्लूटीओ’वरही त्यांनी असेच आक्षेप घेतले आहेत.

“डब्लूटीओ’तील तंटा निवाड्याच्या यंत्रणा अमेरिकेच्या हिताची नाही, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती. या तंटानिवारणात क्‍वचितच अमेरिकेच्याबाजूने निकाल लागला आहे. पण गेल्या वर्षापासून यात बदल होऊ लागला आहे. आपण अमेरिकेचे अध्यक्ष असल्यानेच “डब्लूटीओ’तील खटले अमेरिकेच्या बाजूने होऊ लागले आहेत, असे ट्रम्प म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)