डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

सोमाटणे – डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमाटणे येथे गुरुवारी सकाळी 7.00 च्या सुमारास घडली.

यामध्ये सागर सुनील विश्वास (वय 25 वर्षे रा. शिरगाव मूळचा राहणार पश्‍चिम बंगाल) असे अपघातात दगावलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. संभाजी शिवाजी जाधव,( वय 29 वर्षे मुळचा राहणार धोत्रावनगोजे, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडेकडून देहुरोडच्या दिशेने जात असलेला डंपर (एम एच 14 ए एल 5916) ने सोमाटणे चौकात हायवे रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी क्रमांक (एम एच 42 जी 2310) या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे खाली पडलेल्या सागरच्या डोक्‍यावरुन डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक संभाजी शिवाजी जाधव वय 29 वर्षे मुळचा राहणार धोत्रावनगोजे, ता. चिखली, जि. बुलढाणा यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. बी. बाजगीरे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)