डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आकुर्डी – डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत अठरा वर्षाच्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी सातच्या सुमारास आकुर्डीतील खंडोबा माळ चौकाजवळ घडली.

अनिकेत अण्णासाहेब जकाते (वय 18, रा. चिंचवड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिकेत जकाते सकाळी दूध टाकण्यासाठी दुचाकीवरून जात होता. खंडोबा माळ चौकाजवळ भरधाव वेगात आलेल्या डंपरने (एमएच 02, एवाय 9109) अनिकेतच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)