डंपरच्या धडकेत कचरा वेचक महिलेचा मृत्यू

पिंपरी, दि.12 (प्रतिनिधी)- कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने जोरात धडक दिल्याने कचरा वेचणा-या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.11) सकाळी साड़े आठच्या सुमारास मोशी येथील कचरा डेपो येथे घडली.
छाया कचरु अडागळे (वय 45, रा. बोराटे वस्ती, मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक किशनाथ बिरबल राम (वय 35, रा. जाधववाडी, चिखली) याला अटक करण्यात आली असून डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत छाया यांचा मुलगा सिद्धेश्वर कचरु अडागळे (वय 26) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनाथ कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरवर चालक आहे. बुधवारी सकाळी मोशी कचरा डेपो येथे छाया या कचरा गोळा करत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने त्यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)