ठोस आर्थिक तरतूद नसल्याने घोषणा फसवी

जुन्नर-महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करत त्याचा अध्यादेश काढला ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, शासनाने केवळ परिपत्रक काढले असून यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस आर्थिक तरतूद केली नसल्याने ही घोषणा फसवी ठरण्याची भीती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी व्यक्‍त केली आहे.
याबाबत अतुल बेनके म्हणाले की, माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या कालावधीत जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता. या सरकारने जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करून परिपत्रक काढल्याबद्दल सरकारचे, माजी आमदार वल्लभ बेनके, आमदार शरद सोनवणे, पर्यटन व निसर्गप्रेमी व यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून आभिनंदन करतो. शासनाने पर्यटन तालुका जाहीर करून परिपत्रक काढले. मात्र, त्यावर कोणत्याही स्वरुपाची आर्थिक तरतूद केलेली नाही. यापूर्व काळात तालुक्‍याच्या संदर्भात असणाऱ्या किल्ले शिवनेरी परिसर विकास आराखडा, स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक याबाबत यापूर्वीच्या शासनाने केवळ परिपत्रकच काढले नाही तर भरीव आर्थिक तरतूद देखील केली होती. शासनाने परिपत्रक काढून केवळ घोषणा केली असल्याने प्रत्यक्षात पर्यटन तालुका म्हणून कोणत्या विकासकामांचा समावेश आहे, नाविन्यपूर्ण प्रकल्प कोणते, या पर्यटन विकासाचा आराखडा याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण या परिपत्रका वरून दिसून येत नसल्याने ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचेही बेनके म्हणाले.
शासनाने सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यावर किमान पन्नास कोटी रुपयांची तरतूद करावी. अन्यथा शासनाने केवळ सर्वसामान्य नागरिकांना गाजर दाखविल्याचा प्रकार होईल, अशी टीकाही अतुल बेनके यांनी यावर केली. केवळ मतांच्या राजकारणासाठी 3500 कोटींच्या केवळ हवेत गप्पा मारण्यापेक्षा पर्यटन तालुका, त्याचा आराखडा, तांत्रिक मान्यता, समाविष्ट प्रकल्प याबाबत लोकप्रतिनिधींनी जनतेला माहिती द्यावी, असे आवाहनही अतुल बेनके यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)