ठेकेदाराकडून मारहाण

पिंपरी – दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार करण्यावरून ठेकेदाराने वर्कशॉपमध्ये घुसून मारहाण केली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे बुधवारी (दि. 31) रात्री घडली.

भागवत विक्रम जवरे (वय-44, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप शेठ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागवत यांचे एमआयडीसी भोसरी येथे ओम बीटेक इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप आहे.

आरोपी संदीप शेठ यांचा त्या ठिकाणी कामगार पुरविण्याचा ठेका आहे. बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात असताना आरोपी संदीप तिथे आला. दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार देण्यावरून भागवत आणि संदीप या दोघांमध्ये वादविवाद झाला. त्यावेळी संदीप याने शिवीगाळ करीत भागवत यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक उपनिरीक्षक केदारी तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)