ठेकेदाराकडून भेटवस्तू स्वीकारल्यास शिस्तभंग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी दिवाळीनिमित्त ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू अथवा देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थांकडून कुटुंबीयांना देखील अशा भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. अशी बाब निदर्शनास आल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रक काढले आहे.

प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील कलम 12 नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही भेटवस्तू स्वत: स्वीकारता कामा नये. तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला, त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये. तसेच कर्मचाऱ्याने त्यांच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा औद्योगिक, वाणिज्यिक संस्थांकडून, संघटनांकडून किंवा तत्सम मंडळाकडून केलेला पाहुणचार स्वीकारण्याचे टाळावे असे स्पष्ट निर्देश आहेत.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू, देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थांकडून कुटुंबियांणा भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. सुरक्षा रक्षकांनी अशा भेटवस्तू घेऊन येणाऱ्यास कार्यालयात जाण्यास मज्जाव करावा. अधिकारी, कर्मचाऱ्याने भेटवस्तू स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)