ठिकबसाठी 50 हजार बिनव्याजी अर्थसहाय

बाळसाहेब बेंडे : “भीमाशंकर’कडून महत्त्वाकांक्षी योजना जाहीर

मंचर-भविष्यातील पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी व खताचा परिणामकारक वापर होण्यासाठी ठिबक सिंचन करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दत्तात्रयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून प्रचलीत ठिबक सिंचन योजनेनुसार एकरी 50 हजार बिनव्याजी अर्थसहाय्य तसेच एकरी 5 हजार अनुदान अशी व्यापक ठिबक सिंचन योजना राबविणार असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
भीमाशंकर कारखान्याकडून गाळप हंगाम 2019-2020 मध्ये गाळपास येणाऱ्या खोडवा उसासाठी प्रति मट्रिक टन अनुदान देण्याचे व खोडवा उत्पन्न वाढीसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना बेंडे यांनी जाहीर केल्या. ते म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या सभेमध्ये पुढील गाळप हंगामात गळीतास येणाऱ्या को. 86032, व्हीएसआय 08005, एम.एस 10001 या खोडवा ऊस जातींसाठी 125 रुपये प्रति मे. टन व को .एम. 0265 खोडवा ऊस जातीसाठी 100 रुपये प्रति मे.टन अनुदान देण्याचे ठरले आहे. पाण्याची बचत व भविष्यातील पाणी टंचाई याचा विचार करता शाश्‍वत खोडवा उत्पादनासाठी पाचट न जाळता त्याचे अच्छादन करावे. तसेच पाचटकुट्टी करण्यासाठी कारखान्यामार्फत 2300 रुपये प्रति एकर प्रमाणे बिनव्याजी वसुलपात्र अर्थसहाय्याद्वारे पाचटकुट्टी मशिनधारकांकडून योजना राबविणेत येत आहे. पाचट कुजविण्यासाठी आवश्‍यक जीवाणू कल्चर कारखान्यामार्फत पुरविले जात आहे. तसेच सेंद्रीय खत म्हणून कारखाना उत्पादीत बायोकंपोस्ट एकरी 10 मेट्रिक. टन 700 रुपये प्रति टन दराने उधारीवर पुरवठा केला जाणार आहे.
रासायनिक खतामध्ये खोडवा पिकासाठी एकरी 3 गोणी 10:26:26 अथवा डिएपी 2 व पोटॅश 1 गोणी पुरवठा उधारीवर केला जाणार आहे. रासायनिक खतांची बचत होवून त्यांचा परीणामकारक वापर व कार्यक्षमता वाढ होणेसाठी कारखाना उत्पादित ऍझोफॉस्फो 1 ली. आळवणीसाठी व ऍसिटोबॅक्‍टर 1 ली. फवारणीसाठी ही द्रवरुप जीवाणू खते शेतकी विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध केली आहेत. व्हीएसआय उत्पादीत सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्य फवारणीसाठी उपलब्ध करुन दिली जातात, असे त्यांनी नमूद केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)