ठाण्यात हुक्का बारवर छापे

ठाणे – ठाणे ग्रामीण पोलिसांनी भायंदर परिसरातील चार हुक्का पार्लर्सवर छापे मारले. त्यापैकी एका पार्लर मध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी तेथे 40 हुक्‍क पाईप आणि त्यासाठी लागणाऱ्या तंबाखुच्या 15 पेट्या जप्त केल्या आहेत.

काल पहाटे हे छापे घालण्यात आले. राज्यातल्या हुक्का पार्लर्सवर छापे घालण्याची तरतूद असलेले विधेयक कालच विधानसभेत सादर करण्यात आले आहे. त्यात राज्यात कोठेही सुरू असलेल्या या पार्लरवर छापे घालण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच अशी पार्लर्स चालवणाऱ्यांना 50 हजार ते 1 लाख रूपये दंडाची तरतूदही यात करण्यात आली आहे. राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुर अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या बेकायदेशीर हुक्का पार्लर्स सुरू झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)