ठाण्यात सिव्हील रूग्णालयात 5 रूग्णवाहिकांना आग

ठाणे – ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाजवळ उभ्या असलेल्या पाच रुग्णवाहिकांना आज अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण इतकी होती की तिचे लोळ दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे.

या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र तरीही सुरक्षेसाठी अनेक रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले होते. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्यामुळे अग्निशामक दल येईपर्यंत आग वाढली. आगीचे निश्‍चित कारण अजून कळू शकलेले नाही.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हे एकमेव सिव्हील रूग्णालय आहे. त्यातही ज्या रूग्णवाहिकांना आग लागली त्या अतिदक्षता विभाग जवळ असल्याने प्रश्न अत्यंत गंभीर होता. ही आग लगेच विझवण्यासाठी कुठलीही सोय रूग्णालयात उपलब्ध नव्हती. अनेक रूग्णांना लगेच रूग्णालयाबाहेर नेल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)