ठाण्यातील कृष्ण मंदिरातून 45 लाखांची चोरी

6 चोरट्यांना अटक; मुद्देमाल जप्त

ठाणे – ठाणे शहरातील एका कृष्ण मंदिरातून 45 लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र पोलिसांनी तातडीने हालचाली करून चोरट्यांना पकडले आणि चोरीचा मुद्देमालही परत मिळवला आहे. ठाण्यातील जांबली नाका परिसरातील गोपाल कृष्ण मंदिरामध्ये ही चोरी झाली. मूर्तीवरील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 45 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून त्यामध्ये एका दाम्पत्याचाही समावेश आहे.

चोरट्यांनी शनिवारी रात्री मंदिराच्या मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम पळवली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. रविवारी सकाळी मंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात आले, असे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त सत्या नारायण यांनी पत्रकारांना सांगितले.

मंदिराच्या आवारात बसवलेले सीसीटिव्ही कॅमेरे चोरट्यांनी बंद केले होते. मात्र मंदिराच्या परिसरातील अन्य सीसीटिव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे आणि त्याच्या आधारे प्रमुख आरोपी संतोष कांबळे याला रविवारी दिवा येथील शिल फाटा येथून अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडील माहितीच्या आधारे पोलिसांनी कांबळेची पत्नीसह 5 आरोपींनाही अटक केली. हे सर्वजण चोरीच्या मुद्देमालासह पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 44.76 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)