ठाणे सिडको प्राधिकरणातील कंत्राटी नेमणुकांची चौकशी होणार – रणजित पाटील

मुंबई – ठाणे सिडको प्राधिकरणात कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या ज्या पदांवर सिडको दक्षता कक्षाने आक्षेप घेतलेले आहेत, अशा नेमणुकांची चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य अनिल कदम यांनी ठाणे सिडको प्राधिकरणाच्या ८७ अधिकाऱ्यांवर एसीबीने केलेल्या कारवाईबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, ठाणे प्राधिकरणात गैरव्यवहार व अनियमितताप्रकरणी कारवाई सुरु असताना सेवानिवृत्त अधिकारी विवेक मराठे यांची सिडकोच्या बोर्डाने सल्लागारपदी कंत्राटी नेमणूक केली असली तरी त्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.

सन १९८७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील सिडको प्राधिकरणात गैरव्यवहार, अनियमितता प्रकरणी ८५ आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. त्यामध्ये १५ सापळे रचून सिडको प्राधिकरणाचे १८अधिकारी व खासगी तीन अशा २१ लोकसेवकांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. त्यासोबतच याप्रकरणी २१ जण दोषी आढळून आले असून १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)