ठाणेकरमाळा तलावातील गाळ रॅयल्टीमुक्‍त

मोरगाव- मोरगाव (ता. बारामती) जवळील ठाणेकर मळा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तसेच लोकवर्गणीतून सुमारे 45 वर्षांपूर्वी बांधलेल्या पाझर तलावातील गाळ रॅयल्टी मुक्‍त उपसा जाणार असल्याची घोषणा प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी केली.ठाणेकरमळा येथील पाझर तलावातील गाळ उपशाचा शुभारंभ प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, सरपंच भारती गायकवाड, उपसरपंच दत्तात्रय ढोले, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ठाणेकर मळा येथे 1972 मध्ये पाझर तलावाचे काम झाले आहे. या तलावामध्ये मोठ्याप्रमाणात गाळसाठा झाला असल्याने पाणी कमी प्रमाणात साठत आहे. तसेच या तलावावर सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्र अवलंबुन आहे. यामुळे येथील शेतकरी व मोरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय ढोले यांच्या पुढाकाराने तलावातील गाळ उपाशांच्या कामास सुरवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)