ठाकुरकीच्या मूधबधीर शाळेचा निकाल 100 टक्के

फलटण – ठाकुरकी, ता. फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विद्यालयाच्या दहावीचा निकाल 100% लागला. विशेष म्हणजे या मुलांना सर्वसाधारण मुलांचाच अभ्यासक्रम असतो.

ठाकुरकीतील मुकबधीर विद्यालयाची यंदा पहिलीच बॅच दहावीला होती. कोणतही अनुदान नसताना संस्थेने मुलांसाठी खास प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली होती. सौ. हेमा गोडसे, सौ. वैशाली शिंदे, रेवती काकडे, उदय निकम यांनी मार्गदर्शन लाभले. विधार्थ्यांचे ना. रामराजे नाईक-निंबाळकर, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे, पाणीपुरवठा सभापती सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अतिरिक्त कमिशनर हर्षल निकम, एक्‍साइज अतिरिक्त कमिशनर सुनिल चव्हाण, एसएआय ग्लोबल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्‍टर राजू भोईटे, शिक्षण सभापती सौ. प्रगतीताई कापसे, स्वच्छता समितीच्या सभापती सौ. वौशालीताई अहिवळे, नगरसेवक अजय माळवे, नगरसेवक जगन्नाथ कुंभार, नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके, दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले यांनी अभिनंदन केले. दरम्यान, कार्यकारी अध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची व कमिन्स इंडिया लिमिटेड या मेघा कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा झाली असून मुकबधीर मुलांनी आय. टी. आय.मध्ये विशेष ट्रेनिंग घेतले तर येथेच नोकरीची संधी प्राप्त होणार असल्याचे मत मुख्याध्यापिका सौ. दिप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)