‘ठाकरे’ सिनेमाच पोस्टर न लावल्यामुळे शिवसैनिकांचा आयनॉक्समध्ये राडा

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात आधारित बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमा आज, मुंबई मध्ये पहाटे ४.१५ वाजता प्रदर्शित झाला असून, चित्रपट रिलीजनंतरही सिनेमावरून काही कारणांवरून वाद सुरुच आहे. वाशीमधील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘ठाकरे’ सिनेमाचे पोस्टर न लावल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून, मोठ्या प्रमाणत गोंधळ घातला. जोपर्यंत सिनेमाचं पोस्टर लावत नाही तो पर्यंत चित्रपटगृहामध्ये ठिय्या मांडू असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. यावेळी शिवसैनिकांनी चित्रपटगृहांमध्ये ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.

सिनेमा पाहण्यासाठी सिनेरसिक वाशीच्या आयनॉक्स चित्रपटगृहात सकाळी ८ वाजता पोहोचले मात्र,ठाकरे चित्रपटाचं एकही पोस्टर न दिसल्यामुळे हा वाद निर्माण झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)