‘ठाकरे’ व्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही- बाळा लोकरे

 चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर ‘शिवसेना स्टाईलनं’ उत्तर देऊ

येत्या २५ जानेवारीला बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमा सर्वत्र रिलीज होणार असून, त्याच बरोबर कंगणा रनौतची मुख्य भूमिका असलेला ‘मणकर्णिका’ सिनेमा आणि इम्रान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता सिनेमाबाबतची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये ताणली गेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्हीं भाषांमध्ये रिलीज होणार आहे. पण रिलीजपूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातअडकला. दरम्यानच शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

२५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ सिनेमाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा बाळा लोकरे यांनी दिला आहे. २५ जानेवारीला इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कोणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला ‘ शिवसेना स्टाईलनं ‘ उत्तर देऊ, असा धमकीवजा इशारा लोकरे यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/bala.lokare/posts/2007281709355552

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)