ठाकरे फॅमिलीचे थर्टी फर्स्ट महाबळेश्‍वरात

अविनाश भोसलेंच्या फोर ओक्‍स बंगल्यात मुक्काम

महाबळेश्‍वर – नविन वर्षाच्या स्वागतासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पत्नी रश्‍मी ठाकरे व चिरंजीव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर मोजक्‍या नातेवाईकांसह महाबळेश्‍वरात आज दुपारी दाखल झाले. नेहमीप्रमाणे महाबळेश्‍वर येथील सर्वांत उंच ठिकाणी असलेल्या उद्योगपती अविनाश भोसले यांच्या फोर ओक्‍स बंगल्या मध्ये त्यांचे वास्तव्य राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अयोध्या असो अथवा पंढरपुर असो लाखोंच्या सभासाठी ठाकरे हे आपल्या कुटूंबासह दौरा करतात. अशा व्यक्‍त कार्यक्रमामुळे ठाकरे कुटूंबावर ताण आला असुन त्यांनी या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढुन विश्रांतीसाठी महाबळेश्‍वर गाठले आहे. आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते नवीन वर्षाचे स्वागतही करतील. पुढील वर्षी लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. या लागोपाठ आलेल्या निवडणुकांमुळे पुढील वर्षी त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणे कठीण आहे म्हणूनच नविन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने विश्रांतीसाठी त्यांनी महाबळेश्‍वरला राहणे पसंत केले आहे.

उध्दव ठाकरे यांनी अलिकडेच अयोध्या येथील राम मंदीराचा मुद्‌दा उचलून धरला आहे. या साठी त्यांनी अयोध्या व त्या पाठोपाठ पंढरपूर येथे जाहीर सभा घेवून शिवसेनेची पहले मंदीर फिर सरकार ही भुमिका ठासून मांडली या भुमिकेला चांगला प्रतिसाद देखील मिळाल्याने शिवसेनेचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. महाबळेश्‍वर येथील विश्रांतीनंतर उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा धडाडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)