ठाकरे आणि पवारांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपला फरक पडत नाही !- रावसाहेब दानवे

मुंबई: राजकारणातील दोन दिग्गज नेते पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या तर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं होत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी विमानाने एकत्र प्रवास केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मानली जात आहे. मात्र या दोन दिग्गजांमध्ये नेमकी काय दाळ शिजली, हे अजून तरी गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, राज ठाकरे शरद पवार एकत्र आले तरी भाजपला फरक पडत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. काल पवार आणि ठाकरे यांनी एकत्र प्रवास केल्यामुळे अनेक राजकीय तर्क वितर्क लावल्या गेले. सत्ताधारी सुद्धा या भेटीमुळे अचंबित झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रावसाहेब दानवे म्हणाले, ‘शरद पवार आणि राज ठाकरे भेटीचा आणि त्यांनी सोबत निवडणूक लढवली तरी भाजपला काही फरक पडत नाही. कारण भाजपा नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही’,

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे संदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)