“ठाकरे’साठी कंगना आणि इम्रान हाश्‍मीची माघार

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या शौमिक सेन दिग्दर्शित ‘चिट इंडिया’ चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता पाहता बहुचर्चित मणिकर्णिका हा चित्रपटही आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ आणि ‘चिट इंडिया’ हे दोन चित्रपट 25 जानेवारीलाच प्रदर्शित होत आहेत. मात्र ‘ठाकरे’साठी ‘चिट इंडिया’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मणिकर्णिका’ पुढे ढकला गेला तर त्यामागे आणखी वेगळे कारण असू शकते. शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी आता येत्या 25 जानेवारीला ‘ठाकरे’शिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे, शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हेच त्याचे खरे कारण असू शकते. शिवसेनेशी पंगा घेण्याचे धैर्य कंगणामध्ये नाही. अर्थात याबाबत अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)